शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

असहीष्णूनांच्या सहिष्णू देशा !!!!!!!!!!

खूप पूर्वी कधीतरी वाचलेलं आठवत, "१ असत्य जर १००० वेळा बोललं तर ते सत्य भासायला लागतं". तसं याचाही बऱ्याचदा प्रत्यय आलेला पण आता मात्र त्यावर ठाम श्रद्धाच बसलीय. कारण हि तसं खासच आहे. पहावे तिकडं एकच गलका चालूय, देश असहिष्णू झालाय, असहिष्णू झालाय. बर जे म्हणतायेत देश असहिष्णू झालाय ती ही सगळी नामवंत मानसं. कलेच्या कुठल्या तरी क्षेत्रात नावाजलेली. आता इतकी नामवंत मानसं म्हणतायेत म्हणल्यावर पाणी कुठतरी मुरत असणारच. पण कुठे?????
सगळ्यात पहिल एक गोष्ट लक्षात आली, की जे नामवंत असहिष्णुता वाढली म्हणून प्रश्न विचारातायेत त्यांना विचारलेल्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर मात्र देत नाहीयेत. तेव्हा मात्र थोडं उमजायला लागला की पाणी कुठं मुरतंय. तथाकथित असहिष्णुतेमुळे ज्यांना पुरस्कार परत केले ती नावं जरी डोळ्याखालून घातली तर या नाट्याची सगळी पटकथा उलगडू लागली. वाढत्या असहिष्णुतेला सध्याच्या सरकारला जबाबदार पकडून नयनतारा सयगल यांनी त्यांना मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला. इतिहासात थोडासा डोकावल्यावर असं लक्षात आलं की त्यांना तो पुरस्कार १९८६ साली मिळाला, म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी यांच्या काळात. म्हणजे शिखांचे जे शिरकाण झाले १९८४ मध्ये त्याच्या फक्त २ वर्ष्यानी, त्या हत्याकांडानंतर "एखादा मोठा झाड निर्माळून पडलं की जमीन थोडीशी हलणारच" अशी थोतांड असहिषु भूमिका घेणाऱ्या सरकार कडून तो पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या सहिष्णुता प्रेमाला काय झालेलं. त्या सरकारचा तो पुरस्कार नाकारून त्यांना तिथच सहिष्णुतेचे ४ धडे शिकवावे वाटले नाहीत. बर त्यानंतर ही देश शांत होता कायमच असही नाही. १९९० मधील काश्मिरी पंडितावर स्वताच घर-दार सोडून जायची वेळ आली, १९९२ साली किवा त्यानंतर झालेले बॉम्बस्पोठ दंगली अशा कुठल्याच वेळी त्यांना सहिष्णुतेचा पुळका आल्याचं किंवा पुरस्कार परत केल्याचं ऐकीव नाही. पण जस स्वताला मनापासून नकोस असलेला सरकार या देशात आलं, तसं बर्याच जणांच्या मनातील असहिष्णुतेला पालवी फुटू लागली. यातली बाकीची नावं पण पहा, अशोक वाजपेयी, के सत्चीदानंदन, सारा जोसेफ, आत्मजीत सिंग, काशिनाथ सिंग आणि बरीच. ही सगळीच्या सगळी मंडळी एनकेन मार्गे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी पंतप्रधान होऊ नयेत या एका अजेंड्यासाठी प्रतक्ष या अप्रतक्ष्य पणे अहोरात्र झटत होती. काही तर प्रत्यक्ष वाराणसीला ठाण मांडून होती. सहिष्णुतेच्या रक्षणाचा देखावा उभा करणाऱ्यांची असहिष्णुता तर बघा, अगोदर गळा फाडोस्तोवर टीव्ही वर ओरडत होती,मोदींना धर्मांद ठरवू पाहत होती, त्याचा उपयोग नाही झाला तर, एक "मोदी विरोधी अपील" करणारं पत्रक साईन केलं गेलं, त्याचाही उपयोग होईना मग भाजप वगळता जवळपास सगळ्या पक्षांना मोदींना थांबवा असं अर्जव करण्यात आलं. तेही नसे थोडके म्हणुनी थेट प्रचारात उतरली फक्त मोदी नको इतका टोकाचा असहिष्णू अजेंडा घेऊन. हे मान्य की घटनेन त्यांना कुणाविरुद्धही प्रचार करण्याचा अधिकार दिलाय पण स्वताला नको असलेल्या पण देशातल्या जनतेन बहुमतानं निवडून दिलेल्या व्यक्तीला आणि सरकारला नाकारण्याचा बहुमताचा अपमान करण्याचा अधिकार मात्र नाही. एखाद्या चुकीवर बोट ठेवण्याचा त्या जबाबदारास जाब विचारण्याचा अधिकार आहे पण त्याआडून स्वताच्या पूर्ण न झालेल्या इच्छेचा बदला घेण्याचा अधिकार नाही. बर यांच्या असहिष्णुतेचा कळस बघा. ही लोकं रोज जनतेला कुठल्या तरी चानेल वर बसून धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजतच असतात. पण यांच्यातलेच एक माननीय लोकसभेच्या निवडणुकीत वाराणसीतून कशे tweet करत होते? " मुस्लीम मत फुटण्यापासून थांबवण्यात आम्ही यशस्वी होत आहोत". म्हणजे धर्माच्या नावावर मतांचे ध्रुवीकरण करणारी मानसं त्याच तोंडानं सर्वसामान्यांना धर्मनिरपेक्षतेचे कीर्तन ऐकवणार.
यांचा अजून एक आक्षेप कायम असतो की मोदींची कार्यशैली ही हिटलर सारखी आहे. १० वर्ष एखाद्या न केलेल्या गुन्ह्यासाठी एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक सहन करून पण ती वागणूक देणार्यांशी प्रेमानं वागलेलं हिटलर आम्ही तरी ऐकला नाही. देशातल्या सगळ्यात मोठ्या पदावर विराजमान होताना डोळे भरून आलेला त्याच आसनापुढे नतमस्तक झालेला हिटलर आम्ही तरी वाचला नाहीये. "जग हे एक कुटुंब" ही शिकवण उरी बाळगून जगणारा हिटलर खरच कधी वाचला नाहीये. बहुधा या शहाण्या माणसांच्या वाचण्यातला आणि आकलनातला हिटलर इतका नम्र असावा. आणि विरोधाभास बघा, की उठसुठ कुणाला तरी अकारण हिटलर म्हणून हिणवणारी मानसं स्वत मात्र हिटलरचे तत्वज्ञान पाळताना दिसतात. हिटलर थोडासा जरी वाचला तरी लक्षात येईल की त्यानी  त्याची फौज किंवा त्यासाठी लढणारी फळी नेहमीच एका समाजाची भीती दाखवून, ज्यू लोकांचा बागुलबुवा उभा करूनच उभी केली. म्हणजे कुठल्यातरी समूहाच्या तिरस्कारतुनच त्याचा अत्याचारी लढवू बाणा जन्मलेला. थोडसं बारकाईने पाहिला तर लक्षात येईल की या तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि सहिष्णुतेच्या नाटकी रक्षकांनी स्वताच्या हेतूपूर्ततेसाठी या तत्वज्ञाचा पुरेपूर उपयॊग केलाय. मोदी नावच्या व्यक्तीला देशापुढ आणि जगापुढ एखाद्या राक्षसारख प्रस्तुत करून स्वताचा हेतू साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मोदी नावाची हवी तशी प्रतिमा उभी करून कधी अल्पसंख्याकांना तर कधी सर्वसामान्यांना घाबरवून स्वताच्या किवा माग उभं करण्याचा खेळ खेळण्यात आला. त्यात अपयश आलं किंवा येत गेलं तसतसा काहींचा आक्रस्ताळेपणा वाढतच गेला. म्हणजे उठसुठ लोकशाहीचा गुणगान करणाऱ्यांच्या पचनी बहुमताचा निर्णय पडू यापेक्षा मोठी ती शोकांतिका काय? आता जनतेन तो कौल दिलाच आहे, त्यांच्या नाटकाचा पहीला अंक अपयशी झालाच आहे तर आता लगेच दुसरा अंक सुरु झाला. काय तर म्हणे देश असहिष्णू झालाय? असंकसं अचानक १४ महिन्यात असहिष्णू झाला. हा देश काल ही सहिष्णू होता आणि आजही आहे. हा देश सहिष्णू आहे म्हणूनच ४० वर्ष्यांपेक्षा जास्त काळ एकाच घराण्याची सत्ता सहन करू शकलाय. या देशानं आणीबाणी सहन केली आणि त्यानंतर दुसऱ्याच निवडणुकीत त्याच इंदिराजीना पूर्ण बहुमत दिलंय हे केवळ साहिश्नुतेमुळे. हा देश सहिष्णू आहे म्हणूनच फक्त भावनेच्या भरात नवख्या राजीवजीना ४०० पेक्ष्या जास्त खासदारांचा नजराणा दिलेला.हा देश सहिष्णू आहे म्हणूच १० वर्ष रिमोट वर चालणारं सरकार या देशांना गपगुमानानं सहन केलं. हा देश सहिष्णू होता म्हणूनच तर कुठल्याही घटनात्मक पदावर नसलेले राहुल गांधी देशाच्या मंत्रीमंडळानं सर्वानुमते घेतलेला निर्णय निव्वळ मूर्खपणा म्हणून पत्रकार परिषदेत फाडू शकले तेही देशाचा पंतप्रधान UNO च्या मीटिंगसाठी परदेशी असताना आणि याच चुकीला काही नामवंत शहाणे कुणाची तरी सहिष्णुता म्हणून सांगू शकले. हा देश सहिष्णू आहे म्हणूनच भ्रष्टाचाराचे आकडे लाखो कोटींची मजल गाटु शकले. हा देश सहिष्णू आहे म्हणूनच हुकुमशाहीपणे देश आणि पक्ष चालवू शकणारे लोकशाहीचे गीत दाखवण्यापुरत तरी गाऊ शकतात.
आणि या सर्वाना मदत झाली ती कमकुवत आणि पक्षपाती झालेल्या चौथ्या खांबाची. मुळात आजकालचे बरेच नामवंत पत्रकार आणी संपादक पत्रकारिता सोडून स्वताचे अजेंडे चालवू आणि राबवू पाहत आहेत. बर्याच पत्रकारांची लेखणी आणी वाणी ही एखाद्या समूहाची किवा एखाद्या विचारप्रवाहाची बटिक झाली आहे. त्यांच्या मतप्रवाहात जे जे बसत फक्त तेच सत्य आणि बरोबर, बाकी सगळं असत्य, भ्रष्ट आणि चुकीचा अशी ठाम समजूत घेऊनच काही मंडळी कार्यरत आहे. त्यांना पटणाऱ्या एखाद्या व्येक्तीची प्रत्येक गोष्ट बरोबर वा बरोबर हेतूनं केलेली असते आणि न पटनार्याची प्रत्येक गोष वाईट वा साशंक. म्हणूनच मोदींचा प्रत्येक निर्णय हुकुमशाही म्हणूनच पेश करणारे काही उठावळ पत्रकार आणि संपादक " इंदिराजीना विरोधकामूळच कशी आणीबाणी लादावी लागली किंवा इंदिराजीकडा कसं आणीबाणी लावण्याशिवाय गत्यंतर नव्हता" हे पटवून सांगण्यात स्वताची वाणी आणि लेखणी खर्ची घालू शकतात. आणि ते निर्भीडपणे असं पक्षपातीपणा करू शकतात हेच देशाच्या सहिष्णुतेचा मोठा पुरावा आहे.
फक्त आता एकच सांगावसं वाटतं की नाटकाचा दुसरा अंक खूपच किळसवाना आणि बेचव झालाय. त्यामुळं हे असहिष्णुतेचा रडगाणं थांबवून स्वताच हसू करून घेणं थांबवावं. कारण सर्वसामान्य जनता ही नाटक कंपनी वागत असलेली असहिष्णुता न ओळखण्याइतकी दुधखुळी राहिलेली नाहीये. खायचे आणि दाखवायचे असे सगळे दात आता पाहण्याइतकी राजकीय समज बहुतांशजणांकडे आलेली आहे. आणि जनता सरकारच्या चुकांवरती तुमचे शाब्दिक आणि मौखिक आसूड पाहू इच्छित आहे, चुकीचे अप्रामाणिक आणि पक्षपाती आसूड नाही....!!!!!!

निवृत्ती सुगावे.

५ टिप्पण्या: